23 October, 2024

विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी प्राप्तीकर विभागाला माहिती देण्याचे आवाहन

हिंगोली, दि.23 (जिमाका) : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-2024 दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी सर्वसामान्य नागरिक तथा मतदारांनी प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधावा. या निवडणुकती काळा पैसा वापरला जात असल्याची माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल याबाबत विश्वसनीय माहिती देण्यास संकोच करू नये. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवण्यात येईल. यासाठी सर्वसामान्य जनतेनी प्राप्तीकर विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1800-233-0355 व 1800-233-0356 या क्रमांकावर तसेच व्हॉट्सअप क्रमांक 9403390980 (छायाचित्रे, व्हिडिओ इत्यादी पाठविण्यासाठी) व nagpur.addldit.inv@incometax.gov.in, nashikaddldit.inv@incometax.gov.in या ई-मेलवर माहिती द्यावी, असे आवाहन उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी केले आहे. ******

No comments: