22 October, 2024

हिंगोली जिल्ह्यात खर्च निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांची नियुक्ती

• राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिक किंवा मतदाराची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 22 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्जुन प्रधान यांची निवडणूक खर्च निरीक्षक (Expenditure Observer) म्हणून नियुक्ती केली आहे. अर्जुन प्रधान हे 2014 च्या आयआरएस बॅचचे अधिकारी असून, 9900845990 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. गुजरात केडरचे अधिकारी असलेले अर्जुन प्रधान हे हिंगोली, वसमत आणि कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक खर्चविषयक बाबी पाहणार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक अर्जुन प्रधान यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. *****

No comments: