23 October, 2024

आचारसंहिता भंगाच्या तक्रारी सी-व्हीजील ॲप, 1950 नि:शुल्क क्रमांकावर दाखल करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात आदर्श आचारसंहितेचे भंग झाल्यास सी-व्हीजील अॅपवर तसेच 1950 या नि:शुल्क क्रमांकावर नागरिकांनी तक्रार करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणुकीसाठी भारत निवडणूक आयोग यांच्याकडून 15 ऑक्टोंबरला घोषणा करण्याभत आल्यातमुळे संपूर्ण महाराष्ट्रप राज्या5त व जिल्ह्या त आदर्श आचासंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेल्या दिनांकापासून जिल्ह्या त निवडणूक संदर्भात आदर्श आचारसं‍हितेचा भंग होत असल्यालस नागरीकांनी सी-व्हीजील ॲपद्वारे तसेच १९५० या टोल फ्रि क्रमांकावर फोन करून तक्रारी दाखल करु शकतात. सदरील तक्रारीचे फिल्डकस्त रावरील एफएसटी टिमद्वारे प्राप्त तक्रारींची शहानिशा करून तक्रार १०० मिनिटांत निकाली काढण्याात येते. त्या साठी जिल्हाास्तारावर जिल्हाए नियंत्रण कक्ष स्था पन करण्याात आले आहे. नागरीक सी-व्हीजील ॲपद्वारे जर कोणी बंदुक/पिस्तु्ल प्रदर्शन करणे, दारु वाटप, पैसे वाटप, सरकारी मालमत्ते.चे विद्रुपन, बनावट बातमी, मतदारांची वाहतूक, भेटवस्तू वाटप, पेड न्यूज, जातीत तेढ निर्माण करणारे भाषण, धमकी इत्याादी बाबत प्रकार होत असल्यागस अशा घटनांचे सी-व्हीजील अॅपद्वारे फोटो, व्हिडीओ तसेच ऑडिओ रेकॉर्ड करून ऑनलाईन तक्रारी दाखल करू शकतात. नागरिकांनी या सुविधांचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे. ******

No comments: