15 October, 2024
दिव्यांग मतदारांसाठी ‘‘सक्षम ॲप’’
हिंगोली (जिमाका), दि. 15 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांच्या सोयीसाठी ‘सक्षम ॲप’ची निर्मिती केली आहे. या ॲपद्वारे दिव्यांग मतदारांना त्यांचे मतदार नोंदणी करणे, मतदार यादीत नाव शोधणे, मतदान केंद्र शोधणे, उमेदवारांची माहिती मिळविणे, मतदानाकरिता आवश्यक सोयीसुविधांची मागणी करणे तसेच इतर मतदानासंबंधित माहिती मिळविणे यासाठी ‘सक्षम ॲप’चा उपयोग होणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी सदर ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन मतदान विषयक विविध बाबींचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment