18 October, 2024

टपाली मतपत्रिका व सर्व्हिस वोटरविषयक कामे करण्यासाठी विधानसभा मतदार संघनिहाय नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती

हिंगोली दि. 18 (जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या टपाली मतदान पत्रिका व सर्व्हिस वोटरविषयक कामे व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा समन्वय केंद्र स्थापन करण्यात आले आहे. जिल्हा समन्वय केंद्राचे विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाशी समन्वय साधणे व कामकाज सुरळीत होण्यासाठी विधानसभा निहाय नोडल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अप्पासाहेब पाटील यांची, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी जिल्हा उपनिबंधक सागर बोराडे, जिल्हा सांख्यिकी अधिकारी एस. एम. रचावाड यांची तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी जिल्हा कौशल्य विकास कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे व तहसीलदार आश्विनकुमार माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार विधानसभा मतदारसंघ निहाय नियुक्त नोडल अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कामकाज करावे व वेळोवेळी अहवाल सादर करावा, असे आदेश अपर जिल्हाधिकारी तथा टपाली मतपत्रिकेचे जिल्हा समन्वय अधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. *****

No comments: