23 October, 2024
वेतन, सण अग्रीमांची देयके आजच कोषागारात सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 23 : राज्याच्या लेखा व कोषागारे संचालनालयाचे संचालक यांनी आभासी बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार वेतन व उत्सव अग्रिम देयाकांबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी उद्या गुरुवारी 24 ऑक्टोबर 2024 रोजीच आपली वेतन व उत्सव अग्रिमांची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. त्यानुसार वेतन वेळेवर करणे सोईचे होईल, असे जिल्हा कोषागार अधिकारी यांनी कळविले आहे.
26 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2024 या कालावधीत कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद रहाणार आहे. त्यामुळे या कालावधीत कोणतीही देयके स्वीकारली जाणार नसल्याने वेतन अथवा उत्सव अग्रिमांच्या देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील, असे जिल्हा कोषागार कार्यालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment