31 October, 2024
निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधित बँकेशी संपर्क साधावा
हिंगोली, (जिमाका) दि. 31 : महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती , कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी दि. 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. सदर हयातीचा दाखला संबंधित निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो. तसेच राज्य शासनाच्या धोरणानुसार अधिकाधिक निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी जीवन प्रमाणपत्र प्रणालीमार्फत डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देण्यात यावे. डिजिटल लाईफ सर्टिफिकेट देताना निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी बँक खाते, पीपीओ क्रमांक व Sanctioning Authority- State Government of Maharashtra, Disbursing Authority-Maharashtra State Treasury मध्ये Hingoli या कोषागाराचे नाव अचूक निवडावे.
सर्व राज्य शासकीय निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment