25 October, 2024

कळमनुरी विधानसभेच्या प्रसार माध्यम कक्षातील अधिकारी, कर्मचारी व पत्रकारांना पेडन्यूजबाबत प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 25 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार हिंगोली जिल्ह्यातील 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी तहसील कार्यालय, कळमनुरी जि.हिंगोली येथे स्थापन करण्यात आलेल्या प्रसार माध्यम कक्षातील अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांना आज प्रशिक्षणामध्ये पेड न्यूज व इतर अनुषंगिक बाबींची माहिती देण्यात आली. यावेळी माध्यम व प्रमाणन समितीची रचना, पेड न्यूज, मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक माध्यम, सोशल मिडीया यासाठी जाहिरातीचे प्रमाणन करणे तसेच त्याअनुषंगाने पाठवावयाचे अहवाल व त्यांच्या नमुन्याची माहिती, सोशल मिडिया व मुद्रीत माध्यमातील पेड न्यूज शोधणे व त्यावर कार्यवाही करणे आदी बाबींची माहिती या प्रशिक्षणामध्ये दिली. तसेच पेड न्यूजबाबत वसमत येथील पत्रकारांनाही यावेळी या प्रशिक्षणात जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते आणि जिल्हास्तरीय प्रशिक्षण समितीचे दीपक कोकरे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी वसमत विधानसभा प्रसार माध्यम कक्षाचे रविंद्र पुंड, राजेश पांडे, जिल्हास्तरीय माध्यम कक्षातील कैलास लांडगे तसेच कळमनुरी येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते. *****

No comments: