21 July, 2016

जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.49 मि.मी. पावसाची नोंद
          हिंगोली, दि.21: - जिल्ह्यात गुरूवार दिनांक 21 जुलै 2016 रोजी  सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकुण 7.43 मिलीमीटर  पावसाची  नोंद  झाली  असून  जिल्‍ह्यात दिवसभरात सरासरी  1.49  मिलीमीटर पाऊस झाला आहे.  तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 368.15 मि.मी. पावसाची  नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर पडलेल्या पावसाची टक्केवारी 41.35 टक्के झाली आहे.
जिल्ह्यात  गुरूवार 21 जुलै, 2016 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये  तालुका निहाय पुढील  प्रमाणे  (कंसात  आतापर्यंतचा एकूण  पाऊस) : हिंगोली- निरंक (330.00), वसमत 1.43 (391.53), कळमनुरी – 1.00 (417.98), औंढा नागनाथ – 5.00  (365.25) , सेनगांव निरंक (335.99). आज  अखेर  पावसाची सरासरी 368.15.

*****

No comments: