28 July, 2016

जिल्ह्यातील 576 विद्यार्थी देणार सहाय्यक कक्ष अधिकारी पूर्व परीक्षा
परीक्षा केंद्रावर कलम 144 लागू
हिंगोली, दि. 28 :- जिल्ह्यात सहाय्यक कक्ष अधिकारी (पुर्व) परीक्षा ही दिनांक 31 जुलै, 2016 रोजी (रविवार) सकाळी 10.30 ते 12.00 या वेळात घेण्यात येणार आहे. परीक्षा कालावधीत जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी पुढील दोन परीक्षाकेंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 सकाळी 9.00 ते दुपारी 1.00 या कालावधीत लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
केंद्राचे नाव व एकूण विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे : 1) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (अ) - 288, 2) आदर्श महाविद्यालय हिंगोली भाग (ब) - 288.
सदर परीक्षा उपकेंद्राचे इमारती व यामध्ये परिक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्ती शिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या दोनशे मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन टेलीफोन बुथ चालु ठेवण्यास निर्बंध. सदरील आदेश हा नियुक्त केलेले अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागु राहणार नाही. सदरील आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेले आहे. अशा व्यक्तीना लागु राहणार नाही. परिक्षार्थी यांना परिक्षा केंद्रात मोबाईल, पेजमेकर, गणकयंत्र, इलेक्ट्रॉनिक साधने इत्यादी घेवून जाण्यावर निर्बंध, करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.

***** 

No comments: