19 July, 2016

शासकीय आयटीआय वसतिगृहात मुलींना प्रवेशासाठी आवाहन
हिंगोली, दि. 19 :- अल्पसंख्यांक विकास विभाग महाराष्ट्र शासनातर्फे शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत जि. हिंगोली येथे अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्याकरिता सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या ( अल्पसंख्यांक - 70 टक्के व बिगर अल्पसंख्यांक 30 टक्के ) जागा भरण्याकरिता अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छूक मुलींनी प्रवेश अर्ज आपल्या महाविद्यालयामार्फत भरून अल्पसंख्यांक मुलींचे वसतिगृह व्दारा शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी वसतिगृह समन्वयक श्री. के. डब्ल्यू, शेवतेकर यांच्याशी संपर्क साधावा असे, आवाहन प्राचार्य औद्योगीक प्रशिक्षण संस्था, वसमत यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: