19 July, 2016

गोळीबार सरावासाठी मैदान ( फायर बट ) ची उपलब्धता
        हिंगोली, दि. 19 :- पोलीस अधिक्षक परभणी यांनी परभणी जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांची गोळीबार सराव दिनांक 17, 20, 23, 26 जुलै, 2016 व दिनांक 01, 04, 07, 10, 13, 16, 19 ऑगस्ट, 2016 या कालावधीत घेण्याचे आयोजित केलेले आहे. तरी गोळीबार सरावासाठीचे मौजे वगरवाडी ता. औंढा स. न. 25 व 29 मधील गोळीबार मैदान ( फायर बट ) उपलब्ध करुन मिळण्याची मागणी आलेली आहे. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 22 अन्वये व मुंबई पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 33(1) (ख) व (प) नुसार मौजे वगरवाडी ता. औंढा ना. जि. हिंगोली येथील फायरींग रेंज मैदान वरील कालावधीसाठी उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असे जिल्हादंडाधिकारी हिंगोली यांनी कळविले आहे.
सदर ठिकाण धोकादायक क्षेत्र म्हणुन घोषित करीत आहे, सदरील परिसरात गुरांना न सोडणे व कोणत्याही व्यक्तीने त्या क्षेत्रात प्रवेश करु नये, अशा सुचना पोलीस अधिकारी यांनी दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे संबंधीत गावी सर्व संबंधितांना देण्यात याव्यात, व तहसिलदार औंढा ना. व पोलीस स्टेशन हटृा यांना मौजे वगरवाडी फायरींग बट व परिसरात दवंडीव्दारे व ध्वनीक्षेपकाव्दारे सदरील आदेशाची प्रसिध्दी करावी, असे प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

                                                            ***** 

No comments: