14 July, 2016

जिल्ह्यात शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी तालुकास्तरावर शिबीराचे आयोजन
हिंगोली, दि. 14 :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ऑनलाईन मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनांविषयी मार्गदर्शन व गुणवत्ता शिष्यवृत्तीचे प्रस्ताव स्विकारण्यासाठी तालुकास्तरावर प्रतिवर्षीप्रमाणे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील शिबीराचे आयोजन पंचायत समिती औंढा (नाग.) येथे दिनांक 18 जुलै, 2016 रोजी, वसमत येथे दि. 19 जुलै, 2016 रोजी, सेनगाव येथे दि. 20 जुलै, 2016 रोजी, कळमनुरी येथे दि. 21 जुलै, 2016 रोजी व हिंगोली येथे दि. 22 जुलै, 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात आलेले असून सर्व मान्यताप्राप्त शाळांच्या मुख्याध्यापकांनी प्रस्तावासह उपरोक्त पंचायत समितीच्या ठिकाणी दिलेल्या तारखेस सकाळी 10.00 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

No comments: