28 July, 2016

नारी शक्ती पुरस्काराकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 28 :- केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना व स्वयंसेवी संस्थांना दरवर्षीप्रमाणे यावर्षी राष्ट्रीय स्तरावर नारी शक्ती पुरस्कार सन 2016 या वर्षासाठी प्रदान करण्यासाठी नामांकन प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
तसेच केंद्र शासनामार्फत सामाजिक क्षेत्रात ज्या महिलांनी स्वयंसेवी संस्थांनी मौलिक कार्य केले आहे अशा महिलांच्या सन्मानार्थ स्त्री शक्ती पुरस्कार देण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार रोख रक्कम, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे असणार आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील इच्छूक पात्र महिला व स्वयंसेवी संस्थांनी त्यांचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 10 ऑगस्ट, 2016 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 07 हिंगोली येथे सादर करावेत. विहित नमुन्यातील अर्जासाठी व अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी डी. ए. कारभारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: