15 July, 2016

कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष श्री. किशोर तिवारी यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम
            हिंगोली, दि. 15 :- कै. वसंतराव नाईक शेती मिशनचे अध्यक्ष मा. ना. श्री. किशोर तिवारी हे दिनांक 18 जुलै, 2016 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे : दिनांक 18 जुलै, 2016 रोजी दुपारी 4.00 वाजता वाशिम वरून हिंगोलीकडे प्रयाण. संध्याकाळी 5.00 वाजता हिंगोली येथे आगमन. हिंगोली येथील पीककर्ज आढावा बैठक.
महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या दिनांक 28 एप्रिल, 2016 च्या सरकारच्या 80 टक्के दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना जुने थकीत सन 2012 नंतरचे पीककर्ज पुनर्वसन करून नवीन पीककर्ज दिनांक 31 मे, 2016 पूर्वी देण्याचे आदेश दिले असतांना व जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी अनेक पीककर्ज वाटप मेळावे व प्रत्येक आठवड्यात पीककर्ज वाटपाचा सतत आढावा घेण्यात येत असून मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी सरकाच्या सर्व आदेशाचे दुर्लक्ष करीत पेरणीपूर्वी फक्त 10 टक्के मागील वर्षी पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. तर जुलै महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला तरी राष्ट्रीयकृत बँकांनी जेमतेम 30 टक्के मागील वर्षी पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्यांना कर्ज दिले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकाकडून पीककर्ज वाटपामध्ये फार विलंब होत असून कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या हजारो तक्रारी मिशन कडे येत आहेत. त्याचवेळी ग्रामीण भागातील राष्ट्रीयकृत बँकांनी आपल्या शेकडो अडचणी मांडल्या आहेत. यावर चर्चा करण्यासाठी व सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ पीककर्ज मिळावे यासाठी पीककर्ज आढावा बैठक दिनांक 18 जुलै, 2016 रोजी 5.00 वाजता हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात औरंगाबाद विभागीय आयुक्त यांच्याशी झालेल्या चर्चेत निश्चित करण्यात आले आहे.
मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी जून अखेरची पीक कर्ज वाटपाची माहिती घेतल्यानंतर शेतकरी मिशन ही पीककर्ज आढावा बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीला सर्व बँकांचे व्यवस्थापक, विभागीय व जिल्हास्तराचे जबाबदार अधिकारी हे उपस्थित राहतील. हिंगोली जिल्ह्यातील तालुका स्तरावरील महसुल, ग्रामविकास, कृषि, सहकार तसेच वन विभागाचे सर्व अधिकारी यांनी या बैठकीस उपस्थित राहावे.
त्यानंतर रात्री हिंगोली येथे मुक्काम. दिनांक 19 जुलै, 2016 रोजी सकाळी नांदेड करिता रवाना.

*****  

No comments: