27 July, 2016

वैयक्तिक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट विहित कालावधीत पुर्ण करणे आवश्यक
हिंगोली, दि.27 :- स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) जिल्हा परिषद अंतर्गत सन 2016-17 मधील 125 ग्रामपंचायतीचा समावेश केला असून जिल्ह्यात वर्षभरात एकूण 28 हजार 280 शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत वार्षीक कृती आराखड्यातील 125 ग्रामपंचायतीचे वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट विहीत कालावधीत पूर्ण होण्याकरिता जिल्हाधिकारी अनिल भंडारी  यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक जिल्हाधिकारी  कार्यालयात संपन्न झाली.
 यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी  नईम कुरेशी  व उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दिपाली कोतवाल व पाचही पंचायत समिती गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा कक्षातील तज्ञ, गट संसाधन केंदातील गट समन्वयक आदि उपस्थित होते.
1) जिल्ह्यातील सन 2015-16 मध्ये निवडलेल्या 125 ग्रामपंचायती पैकी माहे एप्रिल ते जुलै पर्यंत 64 ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यत एकही वैयक्तीक शौचालय बांधले नसल्यामुळे संबधित गावातील विस्तार अधिकारी व सदर ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाचे दोन महिन्यात प्रगती न दिसल्यास तात्पुरते वेतनवाढ बंद करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. 2) सन 2016-17 मधील 28 ग्रामपंचायत 15 ऑगस्ट  2016 पर्यत ODF करण्याच्या सुचना देण्यात आल्या. 3) जिल्ह्यातील 100 टक्के फोटो अपलोडिग करणे. 4) म.ग्रा.रोहयो अंतर्गत जिल्हयातील 65गावात वैयक्तीक शौचालयाची  कामे घेण्यात येण्यार आहेत. 5) सन 2015-16 च्या 32 ग्रामंपचायतीचे ODF प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा परीषदेला 15 दिवसात सादर करावेत. 6) जिल्हयात  बेटी बचाव ! बेटी बढाओ  ! अंतर्गत निवड झाल्याने शाळा अंगणवाडी व महिलांची ये-जा असणाऱ्या  कार्यालयात शौचालय व मुताऱ्याची  कायम व अनिवार्य व्यवस्था करावी. 7) जिल्ह्यातील नादुरुस्त शौचालय गाव निहाय सर्वेक्षण करुन माहिती सादर करणे. 8 ) शौचालय बांधकामासाठी मोठया गावात बचत गटाला प्राधान्य दयावे, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी केली.
जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तालुका निहाय व गाव निहाय वैयक्तीक शौचालय बांधकाम आढावा घेतला. त्यामध्ये सर्व तालुक्याचे काम असमाधारक दिसुन आले. त्यामुळे गट विकास अधिकारी व विस्तार अधिकारी यास प्रत्येक महिन्यात 1 हजार शौचालयाचे उदिष्ट देण्यात आले. प्रत्येक गटविकास अधिकाऱ्यास उद्दिष्ट पुर्तीसाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले व गटविकास अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून बाजार भाव निश्चित करणे. ग्रामपंचायत स्तरावर शौचालय बांधकामासाठी साहित्याची उपलब्धता करून देणे. व जिल्हा व पंचायत स्तरावर तक्रार कक्ष स्थापन करण्याची सुचना देण्यात आली.

*****

No comments: