16 July, 2016

क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य करण्यात येणार
22 जुलै, 2016 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
            हिंगोली, दि. 16 :- क्रीडा विभागाच्या नविन शासन निर्णयानुसार क्रीडा सुविधा निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत अनुदानित शैक्षणिक संस्था, खाजगी कल्ब, क्रीडा मंडळे, प्राधिकरणे, स्थानिक स्वराज्य संस्था, यामध्ये दर्जेदार क्रीडा सुविधा निर्माण करणे त्यामुळे खेळाडूंच्या कामगीरीत वाढ होवून आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यास मदत होईल. त्यामध्ये खाजगी/शासनाच्या मार्फत चालविण्यात येणा-या व राज्य शासनाच्या संबंधित विभागाने दिलेल्या मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, कृषी महाविद्यालय, तंत्रशिक्षण व वैद्यकिय महाविद्यालय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत चालविण्यात येणा-या प्राथमिक/माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय, तसेच विविध खेळाच्या विकासासाठी कार्यरत असणा-या व सार्वजनिक विश्वस्त अधनियम 1950 किंवा संस्था नोंदणी अधिनियम 1860 पंजीबद्ध असतील अशा व्यायाम शाळा, क्रीडा मंडळे, एकविध खेळाच्या क्रीडा संघटना, युवा मंडळे व महिला मंडळे तसेच स्थानिक स्वराज्य संस्था, ग्राम पंचायत, नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद व आदिवासी विभागामार्फत चालविण्यात येणा-या आश्रमशाळा इ. अनुदान प्राप्तीसाठी अर्ज करु शकतील.
सदर विहित नमुन्यातील अर्ज दि. 22 जुलै, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत दाखल करणे बंधनकारक राहिल. उशीरा आलेले व अपुर्ण प्रस्ताव स्विकारले जाणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

*****

No comments: