08 July, 2016

सामाजिक न्याय विभागाच्या विविध शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 8: -  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या अस्वच्छ व्यवसाय करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती / विजाभज/ विमाप्र प्रवर्गातील इयत्ता 5 वी ते 10 वी च्या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जातीच्या विदयार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना इयत्ता 9 वी 10 वी चे सन 2016-17 या वर्षाचे ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. शिष्यवृत्तीसाठी पात्र विदयार्थ्यांचे ऑनलाईन अर्ज http://mahaeschol.maharashtra.gov.in  या संकेतस्थळावरुन शाळांनी लवकरात लवकर भरावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
ऑनलाईन भरलेल्या अर्जांची यादी (हार्ड कॉपी) व शिष्यवृत्तीचे ऑफलाईन प्रस्ताव (त्या त्या शिष्यवृत्तीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे) जिल्हा समाज कल्याण अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, हिंगोली यांच्याकडे वेळेत सादर करावेत. जेणे करुन विदयार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ लवकरात लवकर देणे सोयीचे होईल. सदरील ऑनलाईन अर्ज भरतांना चुकीचे अर्ज तसेच विदयार्थ्यांचे चुकीचे बँक खाते क्रमांक अथवा पालकांचे बँक खाते क्रमांक भरू नयेत. अशा चुकीच्या कार्यवाहीमुळे  विदयार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. उपरोक्त बाबतीत योग्य ती काळजी घेऊन मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्तीचे अर्ज ऑनलाईन सादर करावेत.

*****

No comments: