23 July, 2016

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकमान्य टिळक यांना अभिवादन

हिंगोली, दि. 23 :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****

No comments: