30 July, 2016

प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 2 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

हिंगोली, दि. 30 :-  खरीप हंगाम 2016 करीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यात प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. त्यानुसार या योजनेतंर्गत खरीप हंगामाकरिता शेतकरी सहभागाची अंतिम मुदत दिनांक 31 जुलै, 2016 अशी होती. परंतु प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम-2016 या योजनेत जास्तीत-जास्त शेतकऱ्यांना सहभागी होता  यावे, याकरिता मुदत वाढवून दिनांक 2 ऑगस्ट, 2016 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे कृषी आयुक्तालय, पुणे यांनी कळविले आहे.
तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा सरंक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजिकच्या विभागीय कृषि सह.संचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांचे कार्यालयाशी तसेच नजिकच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात आले आहे.

*****  

No comments: