16 July, 2016

23 वी आंतर कंपनी क्रिडा स्पर्धा-2016 ही स्पर्धचे बक्षीस वितरण समारोह संपन्न   

हिंगोली, दि. 15 :- 23 वी आंतर कंपनी क्रिडा स्पर्धा-2016 ही स्पर्धा दिनांक 12 ते 15 जुलै, 2016 दरम्यान राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 12 , एस. आर.पी. कॅम्प, हिंगोली यांनी हॉकी स्पर्धा, बॉस्केट बॉल, खो-खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, फुटबॉल स्पर्धा, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, 800 मीटर धावणे,1500 मीटर धावणे, 5000 मीटर धावणे,10000 मीटर धावणे,4*100 मीटर रिले, 4*400 मीटर रीले,भाला फेक,गोळा फेक, थाळीफेक,लांब उडी, लहान मुले 50 मीटर धावणे, लहान मुली 50 मीटर धावणे, संगीत खुर्ची, थैला रेस (चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांच्यासाठी), रस्सीखेच (प्रमुख अतिथी अधिकारी यांच्यासाठी) खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. 23 वी आंतर कंपनी क्रिडा स्पर्धा -2016 मध्ये यश मिळविणाऱ्या स्पर्धकांना बक्षिस वितरण समारोह कार्यक्रम समादेशक सी. एस. बोईनवाड, सहाय्यक समादेशक अनिल वि. नंदलवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पी. एम. मोरे , श्री. पारडकर, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष श्रीमती अनिता सुर्यतळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला

*****








No comments: