14 July, 2016

वसमत शहरात शासकीय वसतिगृहासाठी
नवीन इमारत किरायाणे देणेसाठी अर्ज करावेत
हिंगोली, दि. 14 :- वसमत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह सन 1996 पासून कार्यरत असून सदर वसतिगृह श्री. बी. एन. बेल यांच्या मालकीच्या खाजगी इमारती कार्यरत आहे. दिनांक 31 मे, 2016 रोजी वसतिगृह इमारतीचा करार संपलेला असून वसतिगृहासाठी वसमत शहरामध्ये नवीन इमारतीचा शोध घेणे सुरू आहे.
1) किरायाणे घ्यावयाची इमारत ही शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये व शहरातील शाळा / महाविद्यालयापासून जवळ असावी. 2) इमारतीचे क्षेत्रफळ किमान 7 हजार ते 7 हजार 500 चौ. फुट इतके असावे. 3) सदर इमारतीमध्ये पर्याप्त खोल्या असाव्यात व पुरेसे स्नानगृह व स्वच्छतागृहे असावेत. तसेच पाण्याची सुविधा असावी. 4) इमारत मालकास सार्वजनिक बांधकाम विभाग, हिंगोली यांनी केलेल्या मुल्यांकनानुसार इमारत भाडे अनुज्ञेय राहिल. 5) इमारतीचे मालमत्ता कर व पाणीपट्टी संबंधीत इमारत मालकास भरावी लागेल तथापि विद्युत कनेक्शनचे बील व नळाने पाणीपुरवठा झाल्यास त्याचे बील शासनास अदा करेल. 6) इमारत सुरक्षित असावी व शक्यतो इमारतीस संरक्षक भिंत असावी. 7) नवीन बांधकाम झालेल्या इमारतीस प्राधान्य देण्यात येईल तसेच अर्ज केला म्हणजे इमारत भाड्याने घेतली असे समजू नये. याबाबत अंतीम निर्णय सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांचा राहील.
सदर शासकीय वसतिगृहासाठी खाजगी इमारत किरायाणे घेणे करिता इच्छूक इमारत मालकाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून इमारत मालकांना दिनांक 20 जुलै, 2016 पर्यंत गृहपाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह वसमत यांच्याकडे लेखी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केलेले आहे.

*****

No comments: