08 May, 2017

एमएचटी-सीईटी -2017 परीक्षा 11 मे रोजी
·   12 परिक्षा केंद्रावर 2 हजार 585 परीक्षार्थी देणार परीक्षा

        हिंगोली, दि.8 : तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत अभियांत्रिकी व औषधनिर्माण शास्त्र या दोन अभ्यासक्रमांच्या  सन-2017 या ‘सामाईक प्रवेश परिक्षा (MHT-CET 2017) गुरुवार दि. 11 मे, 2017 रोजी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे.
            हिंगोली जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी असलेल्या सरजुदेवी भिकुलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली, जिल्हा परिषद बहुविध प्रशाला, हिंगोली, जिल्हा परिषद कन्या शाळा, हिंगोली, खुराणा सावंत इंजि. इ. अकोला रोड, हिंगोली, अनुसया विद्यामंदिर खटकाळी बायपास,  हिंगोली, आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लिश स्कुल, हिंगोली, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल, अकोला रोड, हिंगोली, संतश्रेष्ठ नामदेव महाराज पठाडे महाविद्यालय, हिंगोली, खाकीबाबा इंग्लिश स्कुल, हिंगोली आणि शासकीय तंत्रनिकेतन लिंबाळा, हिंगोली  या 12 परीक्षा केंद्रावर सकाळी 10-00 ते दुपारी 4-30 वाजेपर्यंत तीन सत्रात होणार असून, या परीक्षेसाठी जिल्ह्यातील एकूण 2 हजार 582 परीक्षार्थी परीक्षा देणार आहेत.  
            सदर परीक्षा दि. 11 मे, 2017  रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणार असून, गणित विषयाचा पहिला पेपर सकाळी 10.00 ते 11.30 वाजता, फिजीक्स व केमिस्ट्रीचा दूसरा पेपर 12.30 ते 2.00 वाजता, तर बायोलॉजीचा तिसरा पेपर दूपारी 3.00 ते 4.30 वाजता या वेळेत होणार आहे.
            विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर किमान एक तास अगोदर उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

***** 

No comments: