16 May, 2017

हस्तलिखित व संगणकीकृत
सातबारा दुरुस्तीसाठी चावडीवाचन कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 16: डिजीटल इंडिया राष्ट्रीय भुमि अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ई-चावडी व ई-फेरफार प्रणाली अंमलबजावणी करणेसाठी हस्तलिखीत सातबारा (7/12) व संगणकीय सातबारा (7/12) तंतोतत जुळविणे आवश्यक आहे. त्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भुमि अभिलेख, पुणे यांनी हस्तलिखीत व संगणकीय सातबारा (7/12) तंतोतत जुळविण्या बाबत सूचना दिलेल्या आहेत.
दि. 1 मे, 2017 ते 15 मे, 2017 :  खातेदारांनी www.mahabhulekh.maharashtra.gov.in या संकेतस्थळास भेद देवून त्यांचा गा.न.नं. सातबारा (7/12) अचूक असल्याची खात्री करावी काही आक्षेप असल्यास संबंधित तलाठी यांच्याशी संपर्क साधवा. निशुल्क संगणकीय सातबारा (7/12) पाहण्यासाठी तहसिल कार्यालय व महा ई सेवा केंद्र व आपले सरकार केंद्रावर पाहावयास मिळेल.
दि. 16 मे, 2017 ते 15 जून, 2017 : या कालावधीत प्रत्येक गावात तलाठी, मंडळ अधिकारी तसेच महसूल अधिकारी यांचे उपस्थितीत संगणीकृत सातबारा (7/12) चावडी वाचन घेण्यात येणार आहे. या बाबत तहसिल कार्यालया मार्फत वेळापत्रक तयार करुन प्रसिध्द करण्यात आलेले आहे. सदर चावडी वाचनात संगणकीय सातबारा (7/12) मध्ये काही त्रुटी आढळून आल्यास त्याचवेळी खातेदारांनी आक्षेप नोंदवावा.
दि. 16 जून, 2017 ते 31 जुलै, 2017 : दि. 01 मे, 2017 ते 15 जून, 2017 या कालावधीत संगणकीकृत गा.न.नं. सातबारा (7/12) मधील प्राप्त आक्षेपांचा विचार करुन आवश्यक त्या दुरुस्त्या करण्यात येणार आहे.
सदरील मोहिमेअंतर्गत तयार झालेला बिनचूक संगणकीकृत गा.न.नं. सातबारा (7/12) डिजीटल स्वाक्षरीत खातेदारांसाठी दि. 1 ऑगस्ट, 2017 पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. 
            संगणकीय सातबारा (7/12) मध्ये काही दोष किंवा त्रुटी असल्यास खातेदारांनी संबंधित तलाठी अथवा तहसिल कार्यालयात आक्षेप नोंदविण्यात यावेत. तसेच तहसिल कार्यालयामार्फत दि. 16 मे, 2017 ते 15 जुन, 2017 या कालावधीत आयोजीत करण्यात आलेल्या चावडी वाचनाचे कार्यक्रमात संगणकीय 7/12 मधील आक्षेप नोंदविण्यात येणार आहे. करिता खातेदारांने आपले संगणकीय सातबारा (7/12) दोषमुक्त होणेसाठी आक्षेप नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: