19 September, 2022

 

तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पोर्टलची सुविधा

सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयात 22 सप्टेंबर रोजी एकदिवशीय शिबिराचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथी व्यक्तीसाठी  नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर परसन https://transgender.dosje.gov.in हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या योजनेद्वारे तृतीयपंथीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक जीवनमान उंचावणे तसेच त्यांना मतदान कार्ड, राशन कार्ड, घरकुल योजना, विनामूल्य आरोग्य तपासणी, आदी बाबींसाठी त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ घेता यावा या व्यापक दृष्टिकोनातून दि. 22 सप्टेंबर, 2022 रोजी सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे एक दिवशीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा लाभ हिंगोली जिल्ह्यातील तृतीय पंथीयांनी घेण्यात यावा, असे आवाहन सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.   

*****

No comments: