16 September, 2022

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पोलीस पथकाची रंगीम तालीम

 



हिंगोली (जिमाका), दि. 16 : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात व देवडा नगर येथील हुतात्मा स्मारक येथे निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम घेण्यात आली.

यावेळी परेड कमांडर प्रभारी राखीव पोलीस निरीक्षक सतीश मुळतकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक शिवाजी पाटील, राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज मोहोड यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने रंगीत तालीम सादर केली.

यावेळी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतीष देशमुख, तहसीलदार नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती.

*****

No comments: