29 September, 2022

 

जिल्ह्यातील सर्व शाळा 31 डिसेंबर पर्यंत तंबाखू मुक्त करावेत

                                                                        - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे निर्देश

 


हिंगोली (जिमाका), दि. 29 : कोटपा कायद्यातील दिलेल्या निकषानुसार टोबॅको फ्री स्कूल ॲप्लीकेशनचा वापर करुन जिल्ह्यातील सर्व  शाळा 31 डिसेंबर पर्यंत तंबाखू मुक्त करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी श्री.पापळकर बोलत होते. या बैठकीस आरोग्य विभागाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.लांजेवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, डॉ. खान, डी. एस. चौधरी, मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संघई , श्री. कुलदीप केळकर, आनंद साळवे, अभिजित संघई, शुभांगी लाड, प्रशांत गिरी, भाऊसाहेब पाईकराव आदी उपस्थित होते.

शिक्षण विभागांनी जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखू मुक्त करण्यासाठी सर्व गट शिक्षण अधिकारी यांना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी सूचना  दिल्या.

तंबाखू मुक्त शाळा बाबतचे निकषाविषयी  व कोटपा कायद्याबाबत सलाम मुंबईच्या शुभांगी लाड व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेचे अभिजीत संघई यांनी माहिती दिली.

या बैठकीस सर्व शासकीय कार्यालय प्रमुख उपस्थित होते. यामध्ये आरोग्य, उप विभागीय कार्यालय, पोलीस विभाग, अन्न व औषध प्रशासन, कृषी, बांधकाम, समाजकल्याण, नगर परिषद, वस्तू व सेवा,  कर, जिल्हा माहिती कार्यालय, शिक्षण विभाग, दंत महाविद्यालय आदी विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

****

No comments: