21 September, 2022

 

बोथी येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत बाल कायद्यांची जनजागृती

 


        हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार दि. 20 सप्टेंबर,2022 रोजी जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत मौजे बोथी ता.कळमनुरी जि.हिंगोली  येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत बाल कायद्यांची जनजागृती  करण्यात आली.

            या कार्यक्रमात जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड.अनुराधा पंडीत यांनी बालसंरक्षणाच्या दृष्टीने असलेले बालकांचे हक्क, ज्यामध्ये पोक्सो कायदा, बाल विवाह प्रतिबंध कायदा-2006, बाल कामगार प्रतिबंध कायदा, शिक्षण हक्क कायदा,  बाल कायदे यांच्याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या विविध यंत्रणांविषयी व चाईल्ड लाईन टोल फ्रि क्र. (1098) या विषयी माहिती दिली. तसेच गाव बाल संरक्षण समितीच्या जबाबदाऱ्या याविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व, कामकाज, बालकांचे हक्क व अधिकार, बाल विवाह प्रतिबंध कायदा-2006 तसेच जिल्ह्यात कार्यरत बाल संरक्षण विषयक यंत्रणाबाबत माहिती देण्यात आली.

            या कार्यक्रमास शाळेचे प्रभारी मुख्यध्यापक देशमुख, अधीक्षक कदम, शिक्षक वाकळे, बीडकर, राठोड, श्रीमती गायकवाड, श्रीमती भालेराव, श्रीमती शेळके, क्रीडा शिक्षक नाविद पठाण, शिपाई पाडदे व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.बेले यांनी केले तर श्री. अडबलवार यांनी आभार मानले.

 

*****

No comments: