14 September, 2022

 राष्ट्रीय क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम अंतर्गत

जयपूर येथील आरोग्य उपकेंद्रास जिल्हास्तरीय पथकाची भेट



 

            हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरीय पथकानी प्राथमिक आरोग्य केंद्र कवठा अंतर्गत उपकेंद्र जयपूर येथे आज दि. 14 सप्टेंबर, 2022 रोजी भेट दिली. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  शंकर तावडे यांनी एनसीडीबाबत रेकॉर्ड तपासणी केली. त्यानंतर क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम बाबत पाहणी केली.

आशा स्वयंसेविका यांना सर्वेक्षण दरम्यान  संशयित  क्षयरुग्ण 9 व संशयित कुष्ठरोग रुग्ण  3  असे एकूण 12 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच  गरोदर माता व बालके यांचे लसीकरण करण्यात आले. तसेंच पोषण आहार दिन  निमित्ताने गरोदर माता यांना दररोज आहारामध्ये काय खावे याबाबत प्रदर्शन मांडून माहिती दिली. तसेंच दरमहा प्रसूती किमान 3 अश्या सूचना देण्यात आल्या. त्यासाठी तातडीने उपकेंद्र परिसरात असलेले बोअरवेल तात्काळ  सुरु करावा व पाण्याची व्यवस्था करावी. गावात गृहभेटी दरम्यान किटक शास्त्रीय सर्वेक्षण करुन तापीच्या रुग्णाचे रक्त नमुने घेऊन तपासणी करिता नियमित पाठविण्यात यावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कवठा येथे भेट देऊन सर्व राष्ट्रीय कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला.

यावेळी  जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.गणेश जोगदंड, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक  शंकर तावडे, प्रशांत तुपकरी, जिल्हा समन्वयक बालाजी उबाळे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.गोपाळ गव्हाणे, डॉ.नंदकिशोर खरबल, आरोग्य कर्मचारी माधव होळकर, जयश्री दिपके, आरोग्य सेविका ज्योती आलोणे,आशा स्वयंसेविका  त्रीवेणी परिस्कर, आशा आहेर, संध्या कळंबे, रत्नमाला धांडे, ढोले वैशाली उपस्थित होते.  

क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहिमेदरम्यान नागरिकांनी आरोग्य पथकास सहकार्य करावे. तसेच खालीलप्रमाणे चिन्ह व लक्षणें आढळून आल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क करावा. 

क्षयरोगाची लक्षणे 

दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला. दोन आठवड्यापेक्षा जास्त ताप, वजनात लक्षणीय घट,  भूक मंदावणे, मानेवर गाठ येणे. 

कुष्ठरोगाची लक्षणे

अंगावरील फिकट लालसर चट्टा, चकाकणारी तेलकट त्वचा व अंगावरील गाठी, हाता पायामध्ये बधिरता व शारीरिक विकृती .

वरील प्रमाणे गावात सर्वेक्षण दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सवयसेविका ह्या गृहभेटी दरम्यान आरोग्य शिक्षण देत आहेत.

*******

No comments: