22 September, 2022

 

हिंगोली जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांसाठी

27 व 28 सप्टेंबर रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली यांच्यामार्फत हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने दि. 27 व 28 सप्टेंबर, 2022 रोजी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे.

            या मेळाव्यात धूत ट्रान्समिशन औरंगाबाद, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली, एसबीआय लाईफ इंन्शूरन्स कंपनी लि.हिंगोली येथील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 150 हून अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केलेली आहेत. नोकरी इच्छुक उमेदवारांनी वरील संकेतस्थळावर नोंदणी पूर्ण करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्त पदांसाठी ऑनलाईन अप्लाय (अर्ज) करावे. जेणेकरुन त्यांना ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होता येईल.

आयोजित करण्यात आलेल्या पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सहभागी व्हावे. याबाबत काही अडचण आल्यास 9881150352 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त राजपाल कोल्हे यांनी केले आहे.

******

No comments: