14 September, 2022

 

मौजे  बेलथर  येथे ग्राम  बाल  संरक्षण समितीची  बैठक  संपन्न



            हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांच्या नियोजनानुसार कळमनुरी तालुक्यातील मौजे बेलथर येथील ग्राम पंचायत कार्यालयात दि. 13 सप्टेंबर, 2022 रोजी ग्राम बाल संरक्षण समितीची बैठक संपन्न झाली.

            या बैठकीत जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी  अनुराधा पंडीत यांनी बालसंरक्षणाच्या दृष्टीने असलेले विविध कायदे व गाव बाल संरक्षण समितीच्या जबाबदाऱ्या या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ग्राम बाल संरक्षण समितीचे महत्व व कामकाज, बालकांचे हक्क व अधिकार, बाल विवाह प्रतिबंध कायदा, 2006 तसेच जिल्ह्यात कार्यरत बाल संरक्षण विषयक यंत्रणाबाबत माहिती देण्यात आली.

            ही बैठक ग्राम बाल संरक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच स्वाती दयानंद चट्टे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली असून ग्राम बाल संरक्षण समितीच्या सदस्य सचिव तथा अंगणवाडी सेविका मिरा परसराम शिंदे, शोभाबाई नागोराव पांडे, पोलीस पाटील  आनंदराव डिगांबर वाघमारे, मुख्याध्यापक रमेश चव्हाण, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊराव पांडुजी तावडे, ग्राम पंचायत सदस्य यशवंत संभाजी पाईकराव, नागनाथ गणेशराव ठोंबरे, दिनकरराव नारायणराव देशपांडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नथु संभाजी तावडे व आशाताई आदी उपस्थित होते.

*******

 

No comments: