21 September, 2022

 

सुरेगाव आरोग्य उपकेंद्रावर थोडेसे माय-बापासाठी पण व गरोदर माता यांच्यासाठी

भव्य आरोग्य तपासणी शिबीर

 


हिंगोली (जिमाका), दि. 21 :  प्राथमिक आरोग्य केंद्र लोहरा अंतर्गत उपकेंद्र सुरेगाव ता.औंढा येथे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमित्ताने दि. 19 सप्टेंबर, 2022 रोजी थोडेसे मायबापासाठी पण  व गरोदर माता तपासणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

यामध्ये  वयोवृद्ध नागरिकांची आरोग्य तपासणी करुन उपचार देण्यात आला. आरोग्याबाबत काय  काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच जवळपास 74 गरोदर माता यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना उपचार देण्यात आला. गरोदर मातांनी दररोजच्या जेवणात काय आहार घ्यावा याबाबत सांगितले. सर्वांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात नियमित आरोग्य तपासणी करुन उपचार घ्यावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शिवाजी पवार यांनी सांगितले.

तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यक्षेत्रातील नागरिकांनी सध्या आरोग्य विभागामार्फत चालू असलेल्या दि. 13 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत सुरु असलेल्या कुष्ठरोग व क्षयरोग शोध मोहिमेमध्ये तपासणी करुन घ्यावी. गावात सर्वेक्षण दरम्यान समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा सवयसेविका ह्याच्या गृहभेटी दरम्यान   तपासणी करुन घ्यावी. तसेच नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे, तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजना या योजनेचा पहिल्या अपत्यासाठी गरोदर मातेला एकूण 5 हजार रुपये लाभ तीन टप्प्यात दिला जातो. या योजेनेचा जास्तीत जास्त लाभार्थीने लाभ घावा.आपल्या घराजवळील परिसर स्वच्छ ठेवावा, गावातील नाल्या वाहत्या करावेत, साचलेले डबके यामध्ये जळके ऑइल, रॉकेल टाकणे, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा आदी विषयावर आवाहन अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, वैद्यकीय अधिकारी डॉ.मालू, बालरोग तज्ञ डॉ.मंगेश बांगर, स्त्रीरोग तज्ञ डॉ.सौ बांगर, ग्रामपंचायत सुरेगाव सरपंच माधवराव पोले, पिंपरी  सरपंच पंजाबराव पोले, सुरवाडी सरपंच गुलाब पारवेकर, अंजनवाडा ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव राठोड. समुदाय आरोग्य अधिकारी डॉ रघुनाथ बेंगाळ, डॉ. गजानन जाधव, तालुका आरोग्य पर्यवेक्षक, चक्रधर तुडमे,आरोग्य सहाय्यक डी. आर. पारडकर, आरोग्य कर्मचारी बी. आर. कुटे, आरोग्य कर्मचारी थिटे, ग्रामसेवक कांबळे, पवन दरगु, सुभाष जवाहर, आरोग्य सेविका संगीता गोबाडे, श्रीमती थिटे आदी उपस्थित होते. 

*****

No comments: