10 February, 2025

राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा 12 फेब्रुवारी रोजी हिंगोली दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 10 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा हे दि. 12 फेब्रुवारी, 2025 रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता मोटारीने नांदेड येथून प्रयाण व 7.30 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम. बुधवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता आयुक्त आणि जिल्ह्यात सर्व नगर परिषदांचे मुख्याधिकारी यांच्यासोबत सफाई कर्मचारी यांच्या अडचणीवर चर्चा करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, विकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, कामगार अधिकारी, आरोग्य अधिकारी, सफाईगार कर्मचाऱ्यांच्या विविध योजनाशी संबंधित अग्रणी बँकेचे अधिकारी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आणि जिल्ह्यातील संबंधित यांच्या आढावा बैठकीस उपस्थिती. दुपारी 4 वाजता हिंगोली येथून मोटारीने परभणीकडे प्रयाण. ******

No comments: