10 February, 2025
माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा केंद्र परिसरात 163 कलम लागू
हिंगोली (जिमाका), दि. 10 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक छत्रपती संभाजीनगर विभागीय शिक्षण मंडळामार्फत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा (इयत्ता दहावी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) ही दि. 11 फेब्रुवारी, 2025 ते दि. 18 मार्च, 2025 पर्यंत घेण्यात येणार आहेत. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर सकाळी 9 ते सायंकाळी 5 या कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.
परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बूथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परीक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस अधीक्षक हिंगोली यांनी बंदोबस्त कामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना लागू राहणार नाही. परीक्षार्थींना केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, पेजर, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.
या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment