24 February, 2025

माहे फेब्रुवारीच्या वेतन देयकासोबत जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे दुसरे प्रमाणपत्र जोडण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 24 : शासनाने कर्मचारी सर्वकष माहितीकोष-2024 अद्यावत करण्याचे निर्देश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व आहरण व संवितरण अधिकाऱ्यांनी ऑनलाईन आज्ञावलीमध्ये त्यांच्या कार्यालयाची माहिती अद्यावत केली आहे. त्यानंतर शासन परिपत्रान्वये नमूद वेळापत्रकानुसार दि. 3 डिसेंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 या कालावधीत ऑनलाईन आज्ञावलीमध्ये अद्यावत केलेल्या माहितीमधील त्रुटींचे निराकरण करुन माहिती बरोबर असल्याबाबतचे प्रमाणपत्र-2 जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून प्राप्त करुन घ्यावे. ऑनलाईन आज्ञावलीमध्ये इनव्हॅलीट डाटा या टॅबमध्ये रिमार्कच्या स्तंभात दर्शविलेली त्रुटी दुरुस्त केल्यानंतर ऑनलाईन आज्ञावलीत होम पेजवर उपलब्ध असलेल्या डीडीओ डिक्लेरेशनची प्रत आहरण व संवितरण अधिकारी यांचे नाव, सही व शिक्क्यासहीत जिल्हा सांख्यिकी कार्यालयास सादर करावे. ऑनलाईन आज्ञावलीत आलेल्या त्रुटीची दुरुस्ती करण्यात अडचण येत असल्यास किंवा माहिती बरोबर असल्यास तसे जिल्हा सांख्यिकी कार्यालयास लेखी स्वरुपात कळवावे. जेणेकरुन त्रुटींची दुरुस्ती करण्यास सोपे होईल. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाकडून दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करुन माहे फेब्रुवारी, 2025 (पेड इन मार्च, 2025) च्या वेतन देयकासोबत जोडण्यात यावे अन्यथा माहे फेब्रुवारी, 2025 ची वेतन देयके कोषागार कार्यालयाद्वारे स्वीकारण्यात येणार नाहीत याची सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, हिंगोली व जिल्हा कोषागार अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे. ****

No comments: