05 February, 2025
निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचे प्रमाणपत्र सादर करावेत
हिंगोली, (जिमाका) दि. 05 : महाराष्ट्र कोषागार नियम-1968 नियम क्र. 335 नुसार निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी ते ज्या बँकेतून निवृत्तीवेतन घेतात त्या बँकेमार्फत माहे डिसेंबर या महिन्यात हयात प्रमाणपत्र जिल्हा कोषागार कार्यालय, हिंगोली येथे सादर करणे आवश्यक होते. तथापि, आर्थिक वर्ष 2023-24 चे 341 निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी माहे डिसेंबर,2023 रोजीचे हयात प्रमाणपत्र आणि आर्थिक वर्ष 2024-25 चे 1300 निवृत्तीवेतन धारक, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी माहे डिसेंबर, 2024 रोजीचे हयात प्रमाणपत्र सादर केले नाहीत.
ज्या निवृत्तीवेतन धारकांनी अद्यापपर्यंत उपरोक्त कालावधीचे हयात प्रमाणपत्र सादर केलेले नाहीत. त्यांनी संबंधित बँक शाखेच्या शाखा व्यवस्थापकांच्या स्वाक्षरीसह कोषागार कार्यालय हिंगोली येथे सादर करावेत. तसेच जे निवृत्तीवेतनधारक , कुटुंब निवृत्तीवेतन धारक मयत झाले आहेत, अशा निवृत्तीवेतनधारकाच्या वारसदारांनी कोषागार कार्यालयास लेखी स्वरुपात कळवावे, असे आवाहन कोषागार कार्यालयाने केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment