08 February, 2025
फिरत्या वाहनांवरील दुकानासाठी दिव्यांगांना ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 08 : सन 2024-25करिता दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने हरित उर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना लागू असून, योजनेचा लाभ घेण्यासाठी सोमवार (दि.10)पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
ही योजना लागू करण्यासंदर्भात 10जून 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्या. कडून सुरु आहे. या योजनेला मिळत असलेला प्रतिसाद आणि मागणी लक्षात घेऊन गरजू दिव्यांग व्यक्तींना योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नाव नोंदणी https://register.mshfdc.co.in या लिंकवर सोमवारी दुपारी 12 वाजेपर्यंत करता येणार आहे.
तरी अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापकांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment