10 February, 2025

अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगारासाठी अल्प व्याज दराने कर्ज • 20 फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन प्रस्ताव सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 10 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय किनवट अंतर्गत कार्यक्षेत्रात नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येतात. या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवन उंचावण्याकरिता स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरुपात अल्प व्याजदराने एनएसटीएफडीसी नवी दिल्ली यांच्या सहकार्याने विविध योजना राबविण्यात येत आहेत. यासाठी नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यासाठी लक्षांक देण्यात आले आहे. उपलब्ध लक्षांकानुसार अनुसूचित जमातीच्या इच्छूक सुशिक्षित बेरोजगारांनी www.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने कर्ज प्रस्ताव दि. 20 फेब्रुवारी, 2025 पर्यंत दाखल करावेत. त्यानंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. असे किनवट येथील शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा व्यवस्थापकांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

No comments: