08 February, 2025
ओबीसी महामंडळातील कर्जाच्या एकरकमी परतफेडीवर 50 टक्के व्याजमाफी
हिंगोली (जिमाका), दि. 08 : महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या संपूर्ण थकीत कर्ज रक्कमेत एकरक्कमी भरणा करणाऱ्या लाभार्थ्यास थकीत व्याज रक्कमेत 50 टक्के सवलत देण्याबाबतची सुधारीत एकरकमी योजना दि.३१ मार्च २०२५ पर्यत लागू करण्यात येत आहे. त्यानुसार थकबाकीदार लाभार्थ्यांनी या योजनेचा फायदा घेऊन कर्जमुक्त व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. झुंजारे यांनी केले आहे. त्यासाठी जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, रिसालाबाजार, हिंगोली ४१३५१३ (०२४५६) २२४४६५ येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment