07 December, 2016

आदिवासी विभागाच्या विविध योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 6 : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2016-17 अंतर्गत दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) शेतकरी/सुशिक्षित बेरोजगार युवक/युवतींना योजनेचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवेदन अर्ज मागविण्यात येत आहेत. विहित नमुन्यातील अर्ज या कार्यालयात उपलब्ध असून इच्छुक लाभार्थ्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचे नावे योजनेचा लाभ घेण्यासाठी परिपुर्ण कागदपत्रांसह आवेदन अर्ज दिनांक 21 डिसेंबर, 2016 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावीत. सदर लाभ घेण्याकरिता लाभार्थ्यांनी खालीलप्रमाणे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन आदिवासी विभागामार्फत केले आहे.
अ) उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना -
1) आदिवासी शेतकऱ्यांना 85 टक्के अनुदानावर ताडपत्री पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 7/12 व होल्डींग प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड.
2) प्रशिक्षीत आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर टु इन वन शिलाई व पिकोफॉल मशिन पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) मान्यताप्राप्त औद्योगीक प्रशिक्षण संस्था/शिवणकला प्रशिक्षण केल्याबाबतचे प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) सध्या शिलाईकाम करित असल्याचे स्वत:चे प्रतिज्ञापत्र.
3) आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर सिंगलफेस पिठगिरणी पुरवठा करणे. वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) घराचा नमुना 8 अ प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) चालु महिन्याचे विद्युत मीटरचे बिल.
4) आदिवासी महिला/पुरुषांना 85 टक्के अनुदानावर सिंगलफेस मिरची/मसाला कांडप मशिन पुरवठा करणे वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) घराचा नमुना 8 अ प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) असल्यास दारिद्रय रेषेचे प्रमाणपत्र गुणांकन व यादितीला क्रमांकासह ग्रामसेवक यांचे चालु वर्षातील दिनांकाचे, 9) रेशनकार्ड, 10) चालु महिन्याचे विद्युत मीटरचे बिल.
ब) प्रशिक्षणाच्या योजना -
1) आदिवासी युवक/युवतींना मराठी/इंग्रजी टंकलेखन प्रशिक्षण देणे (अनिवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 10/12 वी पास असल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र 5) बोनाफाईड सर्टिफिकेट, 6) मतदानकार्ड/आधारकार्ड, 7) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा.
2) आदिवासी युवक/युवतींना संगणक (एमएससीआयटी) प्रशिक्षण देणे (अनिवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 10/12 वी पास असल्याचे शैक्षणिक प्रमाणपत्र 5) बोनाफाईड सर्टिफिकेट, 6) मतदानकार्ड/आधारकार्ड, 7) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 8) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा.
3) आदिवासी युवक/युवतींना पीएमटी/पीईटी/एनईईटी चे प्रशिक्षण देणे (निवासी) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) 12 वीत असल्याचे बोनाफाईड प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 7) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा. 
क) मानव साधन संपत्ती विकासाच्या व कल्याणात्मक योजना -
1) आदिवासी महिला बचत गटांना बिछायत भांडीपुरवठा पुरवठा करणे सामुहिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) आदिवासी महिला बचत गटाचे नोंदणी प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) सदर योजनेचा यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, 7) 2 पासपोर्ट साईज फोटो.
2) आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्याकरिता सायकल पुरवठा करणे. (8 ते 12 वी वर्ग) वैयक्तिक - 1) सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र, 2) रहिवासी प्रमाणपत्र, 3) तहसिलचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, 4) बोनाफाईड प्रमाणपत्र/वसतिगृहात प्रवेशित असल्याचे गृहपाल यांचे प्रमाणपत्र, 5) मतदानकार्ड/आधारकार्ड, 6) अलिकडील काळात काढलेले 2 पासपोर्ट साईज फोटो, 7) अर्जावर मोबाईल नंबर नमुद करावा. 
विहित मुदतीनंतर आलेले व परिपुर्ण नसलेले आवेदन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत उपरोक्त योजनांमध्ये पुर्णत:/अंशत: बदल करण्याचा तसेच त्यापैकी कोणतीही योजना राबविण्याचा अथवा न राबविण्याचा निर्णय प्रकल्प अधिकारी यांनी राखुन ठेवलेला आहे, असे आदिवासी विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.

***** 
जिल्हाधिकारी कार्यालयात ‘कॅशलेस पेमेंट’ कार्यशाळा संपन्न
हिंगोली, दि.06: देशात 500 आणि 1000 रुपयांच्या चलन बंद झाल्याने नागारिकांना दैनंदिन व्यवहारात अडचण निर्माण होत आहे. परंतू यासाठी आता सर्व बँकांनी ‘कॅशलेस पेमेंट’ ची सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन दिली आहे. आपल्या दैनंदिन व्यवहार करतांना कॅशलेस पेमेंटचा वापर कशाप्रकारे करावा यासाठी अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात ‘कॅशलेस पेमेंट’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. 
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उप जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणवीर, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक महेश मदान, स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे व्यवस्थापक जयबीर सिंग आणि आरसेटीचे व्यवस्थापक प्रविण दिक्षीत यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘कॅशलेस पेमेंट’ चा वापर करणे ही काळाची गरज झाली आहे. दैनंदिन व्यवहार करतांना कॅशलेस पेमेंटचा वापर करण्यासाठी बँकांनी मोबाईल ॲप तयार केले असून, या ॲपच्या वापराने दैनंदिन व्यवहारात उपयोग होणार आहे. प्रत्येकाने आपले बँक खाते हे आधारशी आणि मोबाईल क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावे. जेणेकरुन आपणांस कॅशलेस पेमेंट सुविधांचा वापर करण्यास मदत होईल. तसेच आपल्या खात्यात होणाऱ्या व्यवहाराची अद्ययावात माहिती प्राप्त होण्यास मदत होईल. सर्वांनी कॅशलेस पेमेंटचा वापर करावा तसेच इतरांनाही याबाबत माहिती देवून या सुविधेचा वापर करण्याबाबत प्रोत्साहित करावे असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेत स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे प्रविण कटरे यांनी बॅंकेने सुरु केलेल्या ‘SBI Buddy’ या ॲपबद्दल मार्गदर्शन केले. तर अलाहबाद बँकेचे श्री. मंडळ यांनी ‘UPI’ या ॲपबाबत मार्गदर्शन केले. बँक ऑफ बडोदाचे विनोद गित्ते यांनी मायक्रो एटीएस बद्दल माहिती देवून याचे प्रात्यक्षिक देखील करुन दाखवले.
            तर अप्पर जिल्हाधिकारी राम गगरानी यांनी बँक कार्ड , युएसएसडी, एईपीएस, युपीआई आणि पीओएस या सुविधांद्वारे देखील कॅशलेस पेमेंटद्वारे दैनंदिन व्यवहार करता येईल याची माहिती दिली.
कार्यशाळेस विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*****
ध्वजदिन निधी 2016 संकलन कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 6 : जिल्ह्यातील माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा यांच्यासाठी ध्वजदिन निधी 2016 संकलन शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली दि. 7 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी हिंगोली जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा यांनी जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे उपस्थित रहावे, असे आवाहन सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

03 December, 2016

भारत सरकार शिष्यवृत्तीचे प्रलंबित अर्ज त्रुटींची पुर्तता करून सादर करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 3 : जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी महाविद्यालयस्तरावर असलेले भारत सरकार शिष्यवृत्ती आणि शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क या योजनेचे स 2015-16 चे प्रलंबित असलेले अर्ज त्रुटींची पुर्तता करून दि. 15 डिसेंबर, 2016 च्या आत ऑनलाईन व मुळ प्रतीसह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयास सादर करावेत. दि. 15 डिसेंबर,2016 नंतर सन 2015-16 चे प्रलंबित अर्ज ऑनलाईन प्रक्रियेव्दारे सादर करता येणार नाहीत. कारण सन 2015-16 साठी दि. 16 डिसेंबर, 2016 पासून संकेतस्थळ (शिष्यवृत्तीची वेबसाईट) बंद करण्यात येणार आहे.
तरी उपरोक्त प्रमाणे सूचविल्यानुसार दि. 15 डिसेंबर, 2016 च्या आत शैक्षणिक सत्र 2015-16 चे ऑनलाईन अर्ज सादर न केल्यास अशा महाविद्यालयाचे विद्यार्थी समाज कल्याण विभागामार्फत कोणत्याही शैक्षणिक योजनेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य व संबंधित विद्यार्थी यांची राहिल, असे आवाहन समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

02 December, 2016

जिल्ह्यातील वाळु घाटाची ई-निविदा संकेतस्थळावर प्रसिध्द
            हिंगोली, दि. 2 : सन 2016-17 मध्ये हिंगोली जिल्ह्यातील 32 व हिंगोली व परभणी चे संयुक्त असलेले वाळु घाट 07, एकूण 39 रेती / वाळु घाटांकरिता दि. 30 सप्टेंबर, 2017 पर्यंतच्या मुदतीसाठी ई-निविदा व ई-ऑक्शनाव्दारे निर्गती करण्यासाठी सविस्तर माहिती गौण खनिज शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली जिल्ह्यातील सर्व तहसिलदार / उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात तसेच https://maharashtra.etenders.inhttps://e-auctions.in आणि www.hingoli.nic.in या वेबसाईट / संकेतस्थळावर पहावयास मिळतील, असे जिल्हा खनिकर्म अधिकारी, हिंगोली यांनी कळविले आहे.

***** 
कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन
हिंगोली, दि. 2 : आयुक्त (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली नोटबंदीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना रोखीची अडचण होऊ नये याकरिता कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन करण्यात येणार आहे.  कृषि निविष्ठांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. या कृषि निविष्ठांची बहुतांशी खरेदी रोखीने केली जाते. सध्याच्या रोख चलन व टंचाईमुळे अशा खरेदीवर अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने खरेदीची रक्कम अदा करण्याची पध्दत अवलंबविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खालील पध्दतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
शेतकरी त्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेतून NEFT (National Electronic Fund Transfer) व्दारे निविष्ठा विक्री केंद्र धारकाच्या खात्यावर निविष्ठा खरेदी बिलाची रक्कम जमा करू शकतो. त्यासाठी शेतकऱ्याने ज्या दुकानातून कृषि निविष्ठा घ्यावयाच्या आहेत त्या दुकानदाराकडून याकरिता स्टेट बँकेने खास बाब म्हणून विकसित केलेल्या आरटीजीएस / एनइएफटी / जिआरपीटी अन्वये अकांऊट ट्रान्सफर अर्जाचा नमुना भरून घ्यावा. त्यामध्ये दुकानदाराचे बँक खाते क्र. व बँकेसंदर्भातील तपशिल जसे आय.एफ.एस.सी. कोड लिहुन घ्यावे. सदर तपशिल शेतकऱ्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेकडे देऊन घ्यावयाच्या निविष्ठांची रक्कम बँकेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावरुन परस्पर दुकानदाराच्या खात्यावर जमा होईल. बँक शेतकऱ्याला पोहोच म्हणून UTR (Unique Trasaction Reference Number) देईल. बँकेद्वारे प्राप्त झालेली UTR (Unique Trasaction Reference Number) शेतकऱ्याने दुकानदाराला दयावी व त्या आधारे दुकानदाराने शेतकऱ्याला कृषि निविष्ठा दयाव्यात.
या संबंधी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना डेबीट स्लिप भरून देण्याची जबाबदारी स्विकारून आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानूसार सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विक्रेत्यांने सद्याची निविष्ठा पुरवठा परिस्थीती चांगली असून चलणी नोटामुळे अडचणी येत असल्यातरी काही शेतकऱ्यांना आम्ही उधारीवर सुद्धा माल देत आहोत असे सांगीतले. पिओएस मशिन बसवण्यात सर्व विक्रेत्यांची तयारी असून त्याचे कमिशन कमी करणे बाबत संबंधीत बॅंकांना आदेश द्यावेत अशी विनंती केली. दुकानात शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा ऑनलाईन पद्धतीने देण्याची कार्यवाही चालू आहे असे फलक आम्ही लावू अशी हमी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली.
शेतकऱ्यांना रोख रक्कमेअभावी कृषि निविष्ठा खरेदी करताना अडचणी उद्भवणार नाहीत व त्याचा परीणाम पिकांच्या पेरणीवर व उत्पन्नावर होणार नाही याकरीता या कार्यपध्दतीचा परीणामकारक अमंलबजावणीकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परवानाधारक कृषि निविष्ठा वितरकांची व कृषि उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी व व्यापारी प्रतिनीधींची सभा आयोजित करून नियोजन करणेबाबत कृषि आयुक्त यांनी सूचना दिल्या. वरील पध्दतीचा अवलंब करण्यासंदर्भात स्थानिक स्तरावर प्रचार व प्रसिध्दी माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी. जेणेकरुन, रोख रकमेअभावी शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा मिळण्यामध्ये अडचणी उद्भवणार नाहीत.

*****

01 December, 2016

विभागीय आयुक्त डॉ. दांगट यांचा जिल्हा दौरा
            हिंगोली, दि. 1 : औरंगाबाद विभागाचे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट हे दि. 02 व 03 डिसेंबर, 2016 रोजी या कालावधीत हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 02 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 11.30 वाजता जिंतूर येथून हिंगोलीकडे प्रयाण. दुपारी 1.00 वाजता हिंगोली येथे आगमन व राखीव. दुपारी 2.00 ते 4.00 वाजता  हिंगोली जिल्हा परिषद वार्षिक तपासणी अहवालाचे वाचन व विकास कामांचा आढावा. दुपारी 4.00 वाजता नरसी नामदेवकडे प्रयाण. दुपारी 4.30 ते 6.00 वाजता नरसी नामदेव येथे मंडळ कार्यालय / ग्रामपंचायतीस भेट व तपासणी. सायंकाळी 6.00 वाजता हिंगोलीकडे प्रयाण व मुक्काम. दि. 03 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 9.30 वाजता हिंगोली येथून औंढा नागनाथकडे प्रयाण. सकाळी 10.00 वाजता औंढा नागनाथ येथे आगमन. सकाळी 10.00 ते 11.30 वाजता औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायत कार्यालयास भेट व आढावा. सकाळी 11.30 वाजता परभणीकडे प्रयाण.  

                                                                                                     *****