02 December, 2016

कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन
हिंगोली, दि. 2 : आयुक्त (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली नोटबंदीच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना रोखीची अडचण होऊ नये याकरिता कृषि निविष्ठांची खरेदीची रक्कम ऑनलाईन करण्यात येणार आहे.  कृषि निविष्ठांची खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाते. या कृषि निविष्ठांची बहुतांशी खरेदी रोखीने केली जाते. सध्याच्या रोख चलन व टंचाईमुळे अशा खरेदीवर अडचणी येऊ नयेत म्हणून शेतकऱ्यांनी ऑनलाईन पध्दतीने खरेदीची रक्कम अदा करण्याची पध्दत अवलंबविणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी खालील पध्दतीचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
शेतकरी त्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेतून NEFT (National Electronic Fund Transfer) व्दारे निविष्ठा विक्री केंद्र धारकाच्या खात्यावर निविष्ठा खरेदी बिलाची रक्कम जमा करू शकतो. त्यासाठी शेतकऱ्याने ज्या दुकानातून कृषि निविष्ठा घ्यावयाच्या आहेत त्या दुकानदाराकडून याकरिता स्टेट बँकेने खास बाब म्हणून विकसित केलेल्या आरटीजीएस / एनइएफटी / जिआरपीटी अन्वये अकांऊट ट्रान्सफर अर्जाचा नमुना भरून घ्यावा. त्यामध्ये दुकानदाराचे बँक खाते क्र. व बँकेसंदर्भातील तपशिल जसे आय.एफ.एस.सी. कोड लिहुन घ्यावे. सदर तपशिल शेतकऱ्याचे ज्या बँकेत खाते आहे त्या बँकेकडे देऊन घ्यावयाच्या निविष्ठांची रक्कम बँकेद्वारे शेतकऱ्याच्या खात्यावरुन परस्पर दुकानदाराच्या खात्यावर जमा होईल. बँक शेतकऱ्याला पोहोच म्हणून UTR (Unique Trasaction Reference Number) देईल. बँकेद्वारे प्राप्त झालेली UTR (Unique Trasaction Reference Number) शेतकऱ्याने दुकानदाराला दयावी व त्या आधारे दुकानदाराने शेतकऱ्याला कृषि निविष्ठा दयाव्यात.
या संबंधी विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना डेबीट स्लिप भरून देण्याची जबाबदारी स्विकारून आयुक्तालयाने निर्गमित केलेल्या परिपत्रकानूसार सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विक्रेत्यांने सद्याची निविष्ठा पुरवठा परिस्थीती चांगली असून चलणी नोटामुळे अडचणी येत असल्यातरी काही शेतकऱ्यांना आम्ही उधारीवर सुद्धा माल देत आहोत असे सांगीतले. पिओएस मशिन बसवण्यात सर्व विक्रेत्यांची तयारी असून त्याचे कमिशन कमी करणे बाबत संबंधीत बॅंकांना आदेश द्यावेत अशी विनंती केली. दुकानात शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा ऑनलाईन पद्धतीने देण्याची कार्यवाही चालू आहे असे फलक आम्ही लावू अशी हमी संघटनेचे अध्यक्ष यांनी दिली.
शेतकऱ्यांना रोख रक्कमेअभावी कृषि निविष्ठा खरेदी करताना अडचणी उद्भवणार नाहीत व त्याचा परीणाम पिकांच्या पेरणीवर व उत्पन्नावर होणार नाही याकरीता या कार्यपध्दतीचा परीणामकारक अमंलबजावणीकरीता जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली परवानाधारक कृषि निविष्ठा वितरकांची व कृषि उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी व व्यापारी प्रतिनीधींची सभा आयोजित करून नियोजन करणेबाबत कृषि आयुक्त यांनी सूचना दिल्या. वरील पध्दतीचा अवलंब करण्यासंदर्भात स्थानिक स्तरावर प्रचार व प्रसिध्दी माध्यमाचा वापर करून शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करावी. जेणेकरुन, रोख रकमेअभावी शेतकऱ्यांना कृषि निविष्ठा मिळण्यामध्ये अडचणी उद्भवणार नाहीत.

*****

No comments: