17 December, 2016

अनुसूचित जाती/जमातीतील
पिडीत व्यक्तींनी आपली ओळख पटवून धनादेश घेऊन जाण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 17 :- अत्याचाराचे बळी पडणाऱ्या अनुसूचित जाती/जमाती च्या व्यक्तींना अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 सुधारित 1995 नुसार दाखल झालेल्या गुन्ह्यातील अत्याचार पिडीतांना गुन्ह्याचे प्रकार किंवा अत्याचाराचे प्रकार व त्यासाठी विहित केलेल्या सुधारित दराप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासन निर्णय क्र.युटीए 2012 प्र.क्र./259/सामासू, दि. 21 ऑगस्ट, 2013 अन्वये जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती च्या मासिक बैठकीत अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते.
अशाच प्रकारे जिल्ह्यातील अत्याचारास बळी पडलेल्या खालील अनुसूचित जाती / जमातीच्या अत्याचार पिडीतांचे मंजुर अर्थसहाय्याचे धनादेश त्यांना वेळोवेळी पत्रव्यवहार करुन व प्रत्यक्ष त्यांचे गावी जाऊन भेटी देऊनही संपर्क होत नसल्यामुळे वाटप न करता आल्यामुळे या कार्यालयात प्रलंबीत आहेत.
1) सौ. सुजाता रंगनाथ इंगोले रा. माळधामणी ता. कळमनुरी जि. हिंगोली, 2) सिध्दार्थ ग्यानबराव सुर्यवंशी रा. नगर परिषद कॉलनी, ह. मु. वर्कशॉप कॉर्नर, नांदेड, 3) विठ्ठल तुळशीराम उगळे रा. वाघजाळी ता. सेनगाव जि. हिंगोली या व्यक्तींनी आपले धनादेश सामाजिक न्याय भवन येथील सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्याकडून कार्यालयीन वेळेत लवकरात लवकर हस्तगत करुन घ्यावे. अन्यथा विलंब झाल्यास सदरची रक्कम शासन खाली जमा करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****

No comments: