17 December, 2016

अनुसूचित जमातीतील प्रवर्गाकरीता
रेडीमेड गारमेंटवर अधारीत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली, दि. 17 : कळमनुरी तालुक्यातील  अनुसूचित जमातीच्या प्रवर्गाकरीता ओटीएसपी योजनेअंतर्गत रेडीमेड गारमेंटवर अधारीत 1 महिना कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत व   महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम.सी.ई.डी) हिंगोली द्वारा आयोजीत करण्यात येत आहे या कार्यक्रमातुन स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरीता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमात रेडीमेड गारमेंट  नियोजन कसे करावे, पिनो, ए लाईल पॅटर्न, फ्रॉक, ब्लाउज , परकर, सलवार सुट विविध प्रकारचे  या प्रकारचे अनेक तांत्रिक प्रात्यक्षिकरित्या प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन , व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बॅंकेची कार्यप्रणली, आदी बाबत व्यक्तीकडुन मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात महिला व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45 , शिक्षण 7 वी पास, शिक्षण सुरु नसावे. जातीचे प्रमाणपत्र नॅशनल बॅकेचे पासबुक झेरॉक्स आवश्यक आहे. प्रवेशाची अंतीम दि. 22 डिसेंबर, 2016  च्या  दुपारी 4.00  वाजेपर्यंत सविता वाढवे  कार्यक्रम आयोजक मो. 9145452209 एमसीईडी द्वारा पंचायत समिती कळमनुरी  ता.कळमुनरी जि.हिंगोली  येथे प्रत्यक्ष भेटुन आपला अर्ज सादर करावा या कार्यक्रमाचे आयोजन दि. 23 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 11.00 वा करण्यात आले आहेत. असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी. बी. लाडे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी, प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

***** 

No comments: