14 December, 2016

पर्यावरण संतुलीत समृध्द ग्राम योजनेचे रुपांतर आता जिल्हा स्मार्ट ग्राम योजना
                हिंगोली, दि. 14 :- राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना विकास कार्यक्रमात सहभागी करून घेण्याकरिता पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजनेच्या सद्यस्थितीतील स्वरूपात व निकषात बदल करण्यात येऊन ही योजना स्मार्ट ग्रामया नावाने योजना मंजुर करण्यात आलेली आहे.
                “स्मार्ट ग्रामयोजनेकरिता दरवर्षी 42 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता पर्यावरणाचे संवर्धन, जतन व संरक्षण करुन समृध्द व संपन्न गावांची निर्मिती करण्याच्या दृष्टीने राज्यात पर्यावरण संतुलित समृध्द ग्राम योजना राबविण्यात येत होती. या योजनेचे अवलोकन केले असता ती योजना विकासाचे एक आदर्श प्रारुप असले तरी राज्यामध्ये एकसमान स्वरुपाचे निकष दिले गेल्याने काही जिल्हे व विभागांना या योजनेच्या व्यवस्थितरित्या लाभ घेता आला नाही म्हणून स्मार्ट ग्रामयोजना सुरू करण्यात आली आहे.
स्मार्ट ग्रामसंकल्पना ही स्वच्छता (Sanitation), व्यवस्थापन (Management), दायित्व (Accountability), अपारंपारिक ऊर्जा आणि पर्यावरण Renewable Energy & Environment) व पारदर्शक व तंत्रज्ञानाचा वापर (Technology & Transparency) संक्षिप्तमध्ये SMART या आधारावर ही गुणांकन पध्दत आधारित असून, याकरिता एकूण 100 गुण ठेवण्यात आले आहेत.
                “स्मार्ट ग्रामयोजनेंतर्गत प्रथम स्तरावर निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीकरिता देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची एकूण रक्कम 10 लक्ष रुपये आहे. तसेच व्दितीय स्तरावर निवडण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींकरिता देण्यात येणाऱ्या पारितोषिकांची एकूण रक्कम 40 लक्ष रुपये आहे व जिल्हास्तरावर स्मार्ट ग्रामम्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायतींना एकूण 50 लक्ष रुपये पारितोषिक प्राप्त होणार आहे.
                तेव्हा सदरील योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: