18 December, 2016

अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. 18 :- अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात दि. 19 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 12.00 वाजता अल्पसंख्यांक हक्क दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमामध्ये शासनामार्फत अल्पसंख्यांकाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे. तसेच शिक्षणाधिकारी (मा) जि.प. हिंगोली यांच्यामार्फत दिनांक 17 डिसेंबर, 2016 रोजी अल्पसंख्यांक दिवसानिमीत्त आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा व भिंतीपत्र स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.
तरी सदर कार्यक्रमास जनतेनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे.

***** 

No comments: