17 December, 2016

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 17 :- राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ आणि राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दिनांक 17 व 18 डिसेंबर, 2016 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
शनिवार दि. 17 डिसेंबर, 2016 रोजी सायंकाळी 8.30 वाजता हदगाव जि. नांदेड येथून वाहनाने हिंगोली कडे प्रयाण. रात्री 10.30 वाजता हिंगोली येथे आगमन व मुक्काम. रविवार दि. 18 डिसेंबर, 2016 रोजी सकाळी 10.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने कडोळी ता. सेनगांव जि. हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वाजता कडोळी येथे आगमन. दुपारी 2.30 वाजता नानाजी देशमुख जन्मशताब्दी समारंभास उपस्थिती. (स्थळ : कडोळी ता. सेनगांव जि. हिंगोली) सायंकाळी 5.00 वाजता कडोळी येथून वाहनाने हिंगालीकडे प्रयाण. सायंकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. सायंकाळी 8.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.
*****


No comments: