13 December, 2016

एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कुल इंग्रजी माध्यमासाठी अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 13 : इंग्रजी माध्यमाच्या आदिवासी एकलव्य रेसिडेन्सियल पब्लिक स्कुल, चिखलदरा जि. अमरावती व सहस्त्रकुंड ता. किनवट जि. नांदेड येथे प्रवेशासाठी अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांच्या अधिनस्त असलेल्या प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या दोन जिल्ह्यातील (परभणी व हिंगोली) सर्व शासकीय/अनुदानित आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व इतर शासन मान्यता प्राप्त प्राथमिक शाळेतील सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5 वी मध्ये शिकत असलेल्या आदिवासी विद्यार्थी सदर स्पर्धा परीक्षेसाठी पात्र राहतील.
इंग्रजी माध्यमाच्या एकलव्य पब्लिक स्कुल, प्रवेश स्पर्धा परीक्षा दि. 05 मार्च, 2017 रोजी आयोजित करण्यात येत आहे. तरी वरील सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी व पालकांनी विहित नमुन्यातील आवेदन पत्र संबंधित शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील मुख्याध्यापक किंवा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांचेकडे विनामुल्य उपलब्ध आहेत. तरी सदरचे आवेदन पत्र जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून त्यांचेकडून प्राप्त करून दि. 31 डिसेंबर, 2016 पर्यंत भरून देण्यात यावे, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

***** 

No comments: