10 December, 2016

मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहिम

हिंगोली, दि.10:- स्वच्छ भारत अभियान उपक्रमाचा भाग म्हणुन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या मार्गदर्शनाने आज मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमेत जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती कार्यालय, महिला बाल विकास विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा सांख्यिकी कार्यालय, पशुसंवर्धन विभाग, लेखा परिक्षण विभाग, खादी ग्रामोद्योग विभाग, रोजगार स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्र, भुजल सर्वेक्षण विभाग आदी विभागातील अधिकारी-कर्मचारी सहभागी झाले होते.
            शनिवारी सकाळीच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचारी यांनी स्वच्छता मोहिमेस सुरुवात करततइमारतीच्या परिसरातील गवत झाडेझुडपी काढण्यासही सुरुवात करण्यात आलीया स्वच्छता मोहिमेत अप्पर जिल्हाधिकारी राम गगराणी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्श तडवी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी श्री. रणवीर, नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक श्री. सु.ल.कमठाणे यांच्यासह संबंधीत विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते
प्रशासकीय कार्यालयांनी अंतर्गत तसेच बाह्य स्वच्छतेस सर्वोच्च प्राधान्य देण्याची सूचना करुननजिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत परिसरात नेहमी स्वछता राहिल याची दक्षता घेण्यात यावी. तसेचचप्रशासकीय मध्यवर्ती इमारतीत कार्यरत असणाऱ्या सर्व विभागाच्या विभाग प्रमुखांनी आपले कार्यालय तसेच आपल्या कार्यालया शेजारील सर्व परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घ्यावी, कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहिल याची दक्षता घ्यावी.
****
















No comments: