13 December, 2016

अंशकालीन उमेदवारांची यादी अद्यावत करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 13 :  सर्व अंशकालीन कर्मचाऱ्यांना आवाहन येते की कार्यालयाने यापूर्वी अंशकालीन उमेदवारांची यादी अद्ययावत केली होती. परंतु बऱ्याच ग्रामीण भागातील अंशकालीन उमेदवारांचा समावेश सदर यादी मध्ये झालेला नसल्याच्या अनुषंगाने शासनास निवेदने प्राप्त झाली आहेत. करिता ज्या उमेदवारांचा
समावेश जिल्हास्तरीय अंशकालीन यादीमध्ये झालेला नाही अशा कर्मचाऱ्यांनी आपली मुळ कागदपत्रे
  व त्याच्या सत्यप्रती सोबत आणून कार्यालयास भेट द्यावी.
सदर माहितीचे संकलन हे जिल्हानिहाय तयार करण्यांत येणार असून सर्व उमेदवारांची यादी ही विभागीय मुख्यालयास दिनांक 30 डिसेंबर, 2016 पर्यंत पाठवायची आहे. याची सर्व कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यावी. अंशकालीन कर्मचाऱ्यांची माहिती ही काळजीपुर्वक व नियोजनपूर्वक संकलित करण्यात येवून ती अद्ययावत केली जाणार आहे. करिता सर्व अंशकालीन उमेदवारांनी आपली माहिती ही काळजीपूर्वक विहीत नमुन्यात भरून कार्यालयास साद करावी. ज्या उमेदवारांनी यापूर्वी आपली कागदपत्रे शपथपत्रासह कार्यालयात सादर केली आहेत. अशा उमेदवारांनी कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

*****

No comments: