14 December, 2016

महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक-2016 साठी रविवारी मतदान

          हिंगोली, दि. 14 :- अव्वर सचिव तथा निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र वैद्यकिय परिषद निवडणूक - 2016 यांचे पत्र क्र. मवैप/निवडणूक-2016/2016/04029, दि.10 डिसेंबर, 2016 तसेच मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या रिट याचिका क्र. 2021/2016 या प्रकरणातील निकालानुसार महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेवर एकूण 9 (नऊ) सदस्य निवडण्यासाठी दि. 18 डिसेंबर, 2016 रोजी निर्वाचन अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रावर निवडणूक घेण्यात येणार आहे.
सदर निवडणूक महाराष्ट्र वैद्यकिय परिषद सुधारित नियम 1964 अन्वये गुप्त मतदान पध्दतीने प्रत्येक जिल्हा मुख्यालयात घ्यावयाची आहे. सदर निवडणूकीसाठी संपुर्ण महाराष्ट्रासाठी एकूण 85 हजार 715 मतदार संख्या असून हिंगोली जिल्ह्यातील मतदार संख्या 319 इतकी आहे. मतदारांना मतदान करणे सुलभ व्हावे या दृष्टीने जिल्हा मुख्यालयी उपलब्ध असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाचे इमारतीतील जागा मतदान केंद्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. मतदारांनी मतदानास येते वेळेस महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेकडून देण्यात आलेले ओळखपत्र किंवा महाराष्ट्र वैद्यकिय परिषदेकडून देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र सोबत आणने आवश्यक आहे. नोंदणी प्रमाणपत्रावर छायाचित्र नसेल तर पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, भारत निवडणूक आयोगाकडून निर्गमित करण्यात आलेले मतदार ओळखपत्र (EPIC), आधार कार्ड किंवा इतर प्राधिकरणाने निर्गमित केलेले छायाचित्र ओळखपत्र सोबत आणने आवश्यक आहे.
            अव्वर सचिव तथा निर्वाचन अधिकारी महाराष्ट्र वैद्यकिय परिषद निवडणूक - 2016 यांचे आदेश क्र. मवैप/निवडणूक/समन्वय अधिकारी/नियुक्ती/2016/04211, दि. 22 नोव्हेंबर, 2016 अन्वये या निवडणूकीकरिता हिंगोली जिल्हा समन्वय अधिकारी म्हणून डॉ. शंकरराव चव्हाण, शासकीय वैद्यकिय महाविद्यालय नांदेडचे सयोगी प्राध्यापक डॉ. ईस्माईल ईनामदार (मो. न. 9422123766) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            सदर निवडणूकीचे हिंगोली जिल्ह्यातील काम पाहणे करिता उपजिल्हा निवडणूक अधिकारी, गोविंद रणविरकर, (मो. नं. 9422378662) यांची तर क्षेत्रिय अधिकारी म्हणून तहसिलदार विजय अवधाने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
            महाराष्ट्र वैद्यकिय परिषद निवडणूक- 2016 बाबतचा इतर तपशिल http://www.maharashtramedicalcouncil.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

*****

No comments: